Anuradha Vipat
माघ पौर्णिमेला गंगा स्नानाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व अनन्यसाधारण आहे .
माघ पौर्णिमेला गंगेत स्नान केल्याने मनुष्याचे सर्व शारीरिक आणि मानसिक दोष दूर होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो.
या दिवशी घेतलेली एक डुबकी हजारो अश्वमेध यज्ञांच्या पुण्याइतकी फलदायी असते.
धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी सर्व देवी-देवता मानवी रूप धारण करून गंगेत स्नानासाठी प्रयागराज येथे येतात
माघ महिन्यात सूर्योदयापूर्वी तीर्थस्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
हे स्नान केवळ शरीरालाच नाही तर आत्म्यालाही शुद्ध करते .
आपल्या घरातील अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल मिसळून स्नान केल्यानेही गंगा स्नानाचे फळ मिळते.