Anuradha Vipat
माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश जयंतीच्या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
गणपती बाप्पाला लाल रंग अत्यंत प्रिय आहे म्हणून या दिवशी लाल रंगाचे कपडे घालून पूजा केल्यास ती अधिक फलदायी ठरते.
माघ शुद्ध चतुर्थी दिवशी काही लोक पिवळ्या रंगाची वस्त्रेही परिधान करतात.
माघ शुद्ध चतुर्थी ही तिथी हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते
माघ शुद्ध चतुर्थीला भगवान गणेशाचा जन्म झाला. माघ महिन्यात 'गणेश जयंती' साजरी केली जाते.
या दिवशी बाप्पाची उपासना केल्याने तो भक्तांना हवे ते वरदान देतो, म्हणून याला 'वरद चतुर्थी' म्हणतात.
माघ महिन्यात थंडी असते, त्यामुळे या दिवशी पूजेत आणि प्रसादात तिळाचा वापर आवर्जून केला जातो म्हणून याला 'तिलकुंद चतुर्थी' असेही म्हणतात