sandeep Shirguppe
ॲसिडिटी, पोटाचे विकार, केसांच्या समस्या, मूतखडा अशा अनेक आजारांवर मगज बिया फायदेशीर आहेत.
पोट साफ, केसांचे गळणे, किडनीतील मूतखडा यावर रामबाण उपाय म्हणून मगज बियाचा उपयोग होतो.
मगज बियांमध्ये सल्फरची मात्रा अधिक प्रमाणात असते त्यामुळे केसगळती कमी होण्यास मदत होते.
मगज बिया तोंडातील अनावश्यक बॅक्टेरिया कमी करतात. त्यामुळे तोंडाची दुर्गंधी कमी होते.
अँटी-एजिंग एजेंट त्याचप्रमाणे अँटी-ऑक्साइडेस मगज बियांमध्ये मोठ्या प्रमाणात असतात.
ज्या व्यक्तिना मूतखडा झाला आहे. त्यांनी या बिया २ चमचे घेऊन त्यात २ वेलदोडे उपाशी पोटी खावे.
ज्याना पित्त किंवा ॲसिडिटी आहे त्यांनी २ चमचा बिया व खडीसाखर तुकडा एकत्र करून चावून चावून खावा.
फायबर वजन कमी करण्यासाठी खूपच महत्वाचे आहे. दिवसभरात मगज बिया २०-२५ ग्राम चावून चावून खा.