Anuradha Vipat
माधुरी दीक्षित तिच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. आज आपण माधुरीचे सौंदर्य आणि फिटनेसचे रहस्य काय आहे हे जाणून घेणार आहोत .
माधुरीच्या फिटनेसचे रहस्य म्हणजे तिची संतुलित जीवनशैली, ज्यात नृत्य, आहार आणि व्यायाम यांचा समावेश आहे.
माधुरीने तिची खास हेल्दी ड्रिंक रेसिपी शेअर केली होती ज्यामुळे ती एकदम फिट राहते. चला तर मग पाहूयात तिची हेल्दी ड्रिंक रेसिपी
माधुरीने रेसिपी शेअर करताना सांगितले, मिक्सरमध्ये 2 कप फ्रोझन फ्रूट टाका, मग ते रास्पबेरी, स्ट्रॉबेरी किंवा ब्लूबेरी असो.
पुढे माधुरीने रेसिपी शेअर करताना सांगितले अर्धा कप ओट मिल्क, बदामाचे दूध किंवा आवडीचे कोणतेही दूध घाला.
अशाप्रकारे माधुरीची एकदम खास हेल्दी ड्रिंक रेसिपी तयार होते. हे हेल्दी ड्रिंक तुम्ही निसर्गाचा आनंद घेत एंजॉय करु शकता.
माधुरीसाठी नृत्य हा तिच्या फिटनेसचा अविभाज्य भाग आहे.