Aslam Abdul Shanedivan
भारतातील असं एक गावं असून येथे तब्बल १७ बँका असून शॉपिंग मॉल देखील आहे.
विशेष म्हणजे या गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती असून येथे परदेशातून मोठ्या प्रमाणात पैसा जमा होतो.
त्यामुळे जगभरातील मोठ्या बँकाना देखील आपली शाखा येथे सुरु करायची असून हे गाव गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील आहे
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव अशी माधापर गावाची ओळख आहे.
येथील घरातील प्रत्येक घरातील २ लोक लंडन आणि युरोपमध्ये राहतात. यामुळे परदेशातून पैसा येथे येतो.
देशातील श्रीमंत गावांच्या यादीत माधापर गावाचा नंबर वरच्या पट्टीत येत असून येथील लोकांचा लंडनशी विशेष संबंध आहे.
गावात असणाऱ्या १७ बँकांमध्ये तब्बल ७ हजार कोटी रुपयांच्या ठेवी असून २०११ च्या जनगणनेनुसार गावची लोकसंख्या १७ हजार होती.