sandeep Shirguppe
भारताला हरितक्रांतीची देणगी देणारे महान शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले.
कृषी शास्त्रज्ञ एम. एस. स्वामीनाथन यांना 'भारतातील हरित 'क्रांतीचे जनक' असेही म्हटले जाते.
कृषी शास्त्रज्ञ एम. एस. स्वामीनाथन यांनी महाराष्ट्रातील मराठवाड्याला भेट दिली होती त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते.
स्वामिनाथन यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी काही उपाययोजना केल्या होत्या परंतु सरकारने यावर काहीही ठोस निर्णय घेतल्याचे अद्यापही दिसून आले नाही.
माफक दरात आरोग्य विमा उपलब्ध करून द्यावा. प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थिती सुधारणे, आत्महत्या बहुल क्षेत्रात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनला जास्त काम करायला लावणे.
राज्यस्तरीय शेतकरी आयोगांची स्थापना करावी. सूक्ष्मपतपुरवठा योजनांची पुनर्रचना करावी.
सर्व पिकांना विम्याचे कवच मिळावे. मंडल किंवा ब्लॉक याऐवजी गाव हे एकक मानावे. सामाजिक सुरक्षा जाळे विकसित करावे. पावसाचे पाणी साठवण्यासाठी आणि जलस्रोत पुनर्भरण याला उत्तेजन द्यावे.
उच्च गुणवत्तेच्या बियाणांचा आणि इतर पूरक बाबींचा योग्य वेळेला, योग्य ठिकाणी आणि परवडेल अशा दरात पुरवठा करावा.
कमी जोखमीचे आणि कमी किमतीचे तंत्रज्ञान पुरवण्यात यावे जेणेकरून पीक हातातून गेले तरीही होणारा तोटा मर्यादित राहील.
बाजार हस्तक्षेप योजना आणि किंमत स्थिरीकरण निधीची उभारणी. शेतमालाच्या आयातीवर शुल्क लावण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांसाठी गावपातळीवर माहिती केंद्र स्थापन करावीत. जनजागृती मोहीम राबवावी.