Anuradha Vipat
ज्योतिषशास्त्रानुसार, काही विशिष्ट गुण आणि स्वभाव असलेल्या स्त्रियांना अत्यंत भाग्यवान मानले जाते.
ज्या स्त्रिया कठीण प्रसंगातही आपला संयम गमावत नाहीत आणि शांत राहून विचार करतात, त्यांच्या घरात लक्ष्मीचा वास असतो.
ज्या स्त्रिया संयमी असतात अशा स्त्रिया कुटुंबात एकोपा टिकवून ठेवतात आणि घराला प्रगतीकडे नेतात
ज्या स्त्रियांच्या मनात इतरांबद्दल दया असते, ज्या नियमित पूजा-पाठ करतात आणि गरिबांना मदत करतात.
धार्मिक वृत्तीच्या स्त्रिया साक्षात अन्नपूर्णेचे रूप मानल्या जातात. त्यांच्या पुण्याईमुळे कुटुंबावर येणारी संकटे टळतात.
ज्या स्त्रिया विचार करून बोलतात आणि वडीलधाऱ्यांचा मान राखतात, अशा स्त्रिया ज्या घरात जातात तिथे सुख-समृद्धी नांदते.
सुसंस्कृत स्त्रिया त्यांच्या बोलण्यातील गोडव्यामुळे समाजात आणि कुटुंबात त्यांची प्रतिष्ठा वाढतात.