Rice Varieties: कमी पावसात भाताचे कोणते वाण निवडाल? जाणून घ्या तज्ज्ञांची शिफारस

Swarali Pawar

कमी पावसातही भात शक्य!

यंदा कमी पावसाचा अंदाज असल्याने योग्य वाण निवडणं गरजेचं आहे. कमी पाण्यात तग धरणारे वाण उत्पादन टिकवण्यास मदत करतात.

Drought Tolerant Paddy Varieties | Agrowon

कोणते वाण निवडायचे?

कमी पाण्याचा ताण सहन करणारे आणि कमी कालावधीचे वाण निवडा. हे वाण अनियमित पावसातही चांगले उत्पादन देतात.

Drought Tolerant Paddy Varieties | Agrowon

कोकणासाठी योग्य वाण

कर्जत ३, रत्नागिरी १, रत्नागिरी ६ हे वाण फायदेशीर ठरतात. हे वाण ११५ ते १२५ दिवसांत तयार होतात.

Drought Tolerant Paddy Varieties | Agrowon

Drought Tolerant Paddy Varietiesकर्जत ७ ची खासियत

कर्जत ७ हा लांबट बारीक भाताचा वाण आहे. थोडा पावसाचा खंड पडला तरी हा वाण तग धरतो.

Drought Tolerant Paddy Varieties | Agrowon

पश्चिम महाराष्ट्रासाठी वाण

इंद्रायणी, फुले राधा आणि फुले समृद्धी यांची शिफारस केली जाते. हे वाण कमी पाण्यातही चांगला प्रतिसाद देतात.

Drought Tolerant Paddy Varieties | Agrowon

विदर्भासाठी योग्य पर्याय

पीडीकेव्ही साधना, पीडीकेव्ही साक्षी आणि शिंदेवाही १ हे वाण उपयुक्त. हे वाण कमी पावसातही चांगले उत्पादन देतात.

Drought Tolerant Paddy Varieties | Agrowon

पाण्याचा ताण किती सहन करतात?

हे वाण साधारण १० ते १५ दिवस पाण्याचा ताण सहन करतात. पण दीर्घ खंड पडल्यास उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.

Drought Tolerant Paddy Varieties | Agrowon

योग्य नियोजनच ठरेल फायदेशीर

वाण निवडीसोबत वेळेवर लागवड आणि पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. योग्य नियोजन केल्यास कमी पावसातही भाताचे उत्पादन टिकते.

Drought Tolerant Paddy Varieties | Agrowon

Soybean Farming: कमी पावसात सोयाबीन लागवड कशी कराल? उत्पादन टिकवण्यासाठी स्मार्ट टिप्स

Agrowon
अधिक माहितीसाठी...