Swarali Pawar
यंदा खरिपात कमी पावसाचा अंदाज आहे. पण योग्य नियोजन केल्यास चांगले उत्पादन मिळवता येते.
जमिनीत ७-१० सेमी ओल झाल्यावरच पेरणी करा. धूळपेरणी टाळल्यास दुबार खर्च वाचतो.
बाजरी, तूर, मूग, उडीद, सूर्यफूल यांसारखी कमी पाण्यात तग धरणारी पिके निवडा. ताण सहन करणारे वाण निवडल्यास फायदा होतो.
पेरणीपूर्वी FIR पद्धतीने बीजप्रक्रिया करा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि खर्च कमी होतो.
बाजरी+तूर, सोयाबीन+तूर अशी आंतरपीक पद्धत फायदेशीर. एक पीक फेल झालं तरी दुसरं उत्पन्न देतं.
माती परीक्षण करूनच खत वापरा. ठिबक किंवा तुषार सिंचनाने पाण्याची बचत करा.
आडवी पेरणी आणि रुंद वरंबा-सरी पद्धत वापरा. मल्चिंग केल्याने जमिनीत ओलावा टिकतो.
विहिरी, शेततळी आणि बोअरवेलचे पुनर्भरण करा. प्रत्येक थेंब वाचवल्यास दुष्काळातही शेती टिकते.