Anuradha Vipat
कमी तेलाचा वापर करूनही जेवण चवदार, सुवासिक आणि हॉटेलसारखे बनवणे सहज शक्य आहे.
आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ही सवय अत्यंत फायदेशीर ठरते.
जेवण बनवण्यासाठी चांगल्या दर्जाची नॉन-स्टिक कढई किंवा जाड बुडाची भांडी वापरा. यामध्ये अगदी अर्ध्या चमचा तेलातही भाज्या न चिकटता चांगल्या परतून निघतात.
भाज्या थेट तेलात फ्राय करण्याऐवजी वाफवून घेतल्यास त्यातील पोषक घटक टिकून राहतात आणि तेलाची गरज भासत नाही.
पनीर, चिकन, मटण किंवा सुक्या भाज्याकरताना थेट तेलात मसाला परतण्याऐवजी मॅरिनेशन पद्धत वापरा.
तेल ओतण्याऐवजी ऑईल स्प्रे बाटलीचा वापर करा किंवा नेहमी चमच्याने मोजून तेल टाका. भाजी शिजताना सुकी वाटल्यास तेल टाकण्याऐवजी वरून २-३ चमचे पाण्याचा हबका मारा आणि वाफेवर शिजवा.
जेवणात आले-लसूण पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना आणि कसुरी मेथी यांसारख्या घटकांचा वापर जास्त करा.