Anuradha Vipat
रक्त हे शरीरातील एक महत्त्वाचे ऊतक आहे. शरीरात किमान वजनाच्या ७ ते ८% इतके रक्त असते.
शरीरात रक्त कमी असल्यास अनेक समस्या निर्माण होतात जसे की चक्कर, अशक्तपणा येणे.
शरीरात रक्त कमी असल्यास आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा हे आजच्या या लेखात पाहूयात.
रक्त कमी असल्यास हिरव्या पालेभाज्या खा. हिरव्या भाज्यांमध्ये लोह आणि फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते.
रक्त कमी असल्यास कडधान्ये खा. कडधान्यांमध्ये लोह, प्रथिने आणि फोलेट असते.
रक्त कमी असल्यास बीट खा. बीटरूटमध्ये लोह, व्हिटॅमिन सी आणि फॉलिक ॲसिडचे प्रमाण जास्त असते
खजूर आणि मनुका शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवतात.