Anuradha Vipat
स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वतःचा आदर करणे, स्वतःच्या दोषांसह स्वतःचा स्वीकार करणे आणि स्वतःच्या आनंदाला प्राधान्य देणे होय.
सोशल मीडियावरील लोकांचे 'परफेक्ट' आयुष्य पाहून स्वतःला कमी लेखू नका.
तुमच्याकडून भूतकाळात झालेल्या चुकांसाठी स्वतःला सतत दोष देणे किंवा स्वतःचा तिरस्कार करणे थांबवा.
प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. त्यामुळे इतरांशी स्पर्धा करण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा.
रोजच्या धावपळीतून किमान ३० मिनिटे फक्त स्वतःसाठी काढा.
तुमच्या मानसिक शांततेपेक्षा काहीही मोठे नाही. त्यामुळे जिथे गरज असेल तिथे नम्रपणे 'नाही' म्हणायला शिका.
रोज सकाळी आरशात पाहून स्वतःला सांगा, "मी जसा/जशी आहे, तसा उत्तम आहे आणि मी स्वतःचा आदर करतो/करते." स्वतःचे कौतुक करायला शिका.