Anuradha Vipat
सायबर फ्रॉडपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी वैयक्तिक माहिती आणि कोणत्याही अनोळखी लिंक किंवा कॉलवर विश्वास न ठेवणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे.
तुमचा बँक OTP, यूपीआय पिन (UPI PIN) किंवा एटीएम पिन कोणाशीही शेअर करू नका.
अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून फोनमध्ये AnyDesk किंवा TeamViewer सारखे स्क्रीन शेअरिंग ॲप्स इंस्टॉल करू नका.
तुमच्या ईमेल आणि बँक खात्यांसाठी अक्षरे, अंक आणि चिन्हांचा (@, #, $) समावेश असलेला कठीण पासवर्ड ठेवा.
लॉटरी, रिवॉर्ड्स, केवायसी अपडेट किंवा अकाऊंट फ्रीज झाल्याचे सांगणाऱ्या मेसेजमधील लिंक्सवर क्लिक करू नका.
रेल्वे स्टेशन किंवा कॅफेमधील मोफत सार्वजनिक वाय-फाय वरून कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका.
सायबर फसवणूक झाल्यास ताबडतोब १९३० (1930) या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन नंबरवर कॉल करा.