Anuradha Vipat
तुम्ही खरोखर प्रेमात आहात की नाही हे ओळखण्यासाठी काही भावनिक आणि शारीरिक लक्षणे ओळखणे महत्वाचे आहे.
अनेकदा प्रेमाची भावना इतकी प्रबळ असते की सुरुवातीला ती केवळ आकर्षण वाटते.
तुम्ही तुमच्या दिवसातला जास्तीत जास्त वेळ त्या व्यक्तीचाच विचार करत असाल, तर हे प्रेमाचे एक मोठे लक्षण आहे.
तुमच्या आयुष्यात काही चांगले घडले किंवा तुम्ही दुःखी असाल तर सर्वात आधी त्या व्यक्तीला सांगता.
त्या व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी तुम्ही इतर गोष्टी टाळत असाल तर हे प्रेमाचे संकेत आहेत.
तुम्ही तुमच्या स्वतःच्या आनंदापेक्षा त्या व्यक्तीच्या आनंदाला जास्त प्राधान्य देता.
तुम्ही त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या छोट्या समस्या किंवा त्यांच्या गरजांकडे लक्ष देता.