Aslam Abdul Shanedivan
सध्याच्या धावपळ आणि दगदगीच्या जीवनात अनेकांना निद्रा नाशाची समस्या उद्भवते
अशा वेळी झोप पूर्ण न झाल्यास चिडचीड, गॅससह इतर अनेक समस्या उद्भवतात
अशा वेळी शांत झोप लागण्यासह इतर समस्यांच्या निराकरणासाठी कमळाचा वापर लाभदायक ठरू शकतो
कमळाचे बीज आणि त्याचा अर्क झोप सुधारण्यास मदत करतो. याचे सेवन केल्याने नैसर्गिक झोपेची गुणवत्ता सुधारते.
कमळाच्या बीजांचा उपयोग रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी केला जातो. त्यामुळे डायबेटीस नियंत्रित करण्यास मदत होते.
कमळाच्या फुलांमध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचा चमकदार आणि तजेलदार होते. याच्या वापराने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.
कमळाच्या मुळांतील अँटीडायरियल गुणधर्म अतिसार आणि डायरिया यावर प्रभावी ठरतो.