Aslam Abdul Shanedivan
आंघोळीच्या पाण्यात कापूर टाकल्यास यातील अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म मुरुमांची समस्या कमी करण्यास मदत होते
याशिवाय त्वचेवरील ऍलर्जी, डाग, इन्फेक्शन किंवा त्वचेवर होणारी खाज कमी करण्यास मदत होते. मात्र वापराआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कापूरमध्ये बुरशीविरोधी गुणधर्म असल्याने केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते.
याशिवाय यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म टाळूवर जळजळ आणि खाज दूर करते
कापूर पाण्याने स्नान केल्याने मन शांत होऊन मूड सुधारतो
कापूरमध्ये असणाऱ्या दाहक-विरोधी गुणधर्मामुळे स्नायू आणि सांधेदुखी कमी होण्यास मदत होते.
आंघोळीसाठी कापराचा वापर करण्यासाठी १ ते २ कापूर गोळ्या किंवा कापूर तेलाचे २ थेंब पाण्यात टाका. ते विरघळल्यानंतर आंघोळ करा. (वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या)