Mahesh Gaikwad
मणुके म्हणजेच बेदाणे पोषण तत्त्वांनी समृध्द असतात. बेदाण्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास वजन कमी करण्यासाठी फायदा होतो.
बेदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात, जे पचनशक्ती सुधारतात. यामुळे बध्दकोष्ठतेची समस्या दूर होते. तसेच शरीर डिटॉक्स होईन चरबी कमी होते.
बेदाण्यामध्ये नैसर्गिक साखर असते. ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते. परिणामी वेटलॉस करताना थकवा जाणवत नाही.
बेदाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स व अमिनो अॅसिड्स असतात, जे मेटाबॉलिझम बूस्ट करतात. यामुळे चरबी लवकर जळण्यास मदत होते.
बेदाण्यातील फायबर आणि नैसर्गिक साखरेमुळे याचे सेवन केल्यानंतर दिर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. परिणामी वारंवार खाण्याची सवय कमी होते.
जंकफूड खाण्याऐवजी मूठभर बेदाणे खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक पोषण तर मिळतेच, पण वजनही वाढत नाही.
वजन नियंत्रित ठेवण्यासोबतच बेदाणे ह्रदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
दररोज सकाळी १२-१२ भिजवलेले बेदाणे खाल्ल्यामुळे वजन कमी करण्यासाठी फायदा होतो, परंतु याचे अतिरिक्त सेवन करणे टाळावे.