Mahesh Gaikwad
भारतातील पारंपरिक आरोग्यदायी पेय म्हणून सत्तू ओळखले जाते. सत्तू म्हणजे भाजलेल्या चणे आणि इतर धान्यांच्या पीठांचे मिश्रण. हे मिश्रण प्रथिने, तंतुमय पदार्थ आणि जीवनसत्त्वांनी भरलेले असते.
सत्तू पोटासाठी हलके आणि सहज पचणारे अन्न आहे. सत्तूमध्ये भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
सत्तूमध्ये नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीराला दिवसभर ऊर्जा देतात. उन्हाळ्यात थंडावा देणारे पेय म्हणून सत्तू उत्तम आहे.
सत्तूमुळे पोट भरल्यासारखे राहते, ज्यामुळे सतत भूक लागत नाही. तसेच यामुळे चयापचय (मेटाबॉलिझम) वाढते आणि वजन नियंत्रणास मदत होते.
सत्तूचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे ते रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि मधुमेहींसाठी हे उत्तम आहे.
सत्तूमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि प्रथिने असतात, जे त्वचा उजळ करतात आणि केस मजबूत बनवतात. नैसर्गिक सौंदर्य वृद्धीकरिता उपयुक्त.
सत्तू कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यात मदत करते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. ही माहिती सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.