Mahesh Gaikwad
जगभरात वाढत्या वजनाच्या समस्येने अनेकजण चिंतेत आहेत. वेटलॉससाठी अनेकजण जिममध्ये तासनतास घाम गाळतात.
वजन कमी करण्यासाठी विना जिम आणि कोणताही डाएट प्लान फॉलो न करताही तुम्ही वजन कमी करू शकता.
दिवसभर भरपूर आणि पुरेसे पाणी प्या. ज्यामुळे मेटाबॉलिझम वाढते, भूक कमी लागते आणि जलद चरबी वितळते.
जिममध्ये जाऊन हेवी वर्कआउट करण्याऐवजी रोज सकाळी ३० मिनिटे चालल्यामुळे कॅलरीज जळतात, ज्यामुळे शरीर हलके वाटते आणि वजन कमी होते.
दररोज पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. कमी झोप भूक वाढवणारे हार्मोन्स सक्रिय होतात. त्यामुळे ७–८ तासांची झोप आवश्यक आहे.
वजन कमी करण्यासाठी आहारात साखरेची वापर कमी करावा. साखरेऐवजी नैसर्गिक गोडवा देणारी फळे खावीत.
आहारामध्ये प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळेही वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
भूक लागल्यावर बिस्कीट, चिप्स किंवा फास्टफूड खाणे टाळा. त्याऐवजी फळे, सुकामेवा किंवा अंकुरित धान्य खाल्ल्याने वजन कमी होते.