Anuradha Vipat
लहान मुलांच्या वाढीसाठी आणि त्यांना दिवसभर ऊर्जा मिळण्यासाठी टिफिनमध्ये चवदार आणि पौष्टिक आहार देणे अत्यंत गरजेचे आहे.
मुले भाज्या खाण्यास कंटाळा करतात, त्यामुळे भाज्यांचा हुशारीने वापर करून बनवलेले काही निरोगी आणि झटपट होणारे टिफिन पर्याय खालीलप्रमाणे आहेत.
पालक पराठा, मेथी पराठा किंवा बीटचा पराठा. यामध्ये भरपूर फायबर आणि व्हिटॅमिन्स असतात. पराठ्याला रोल करून दिल्यास मुले तो आवडीने खातात.
मुगाचे किंवा मूग डाळीचे धिरडे किंवा उकडलेल्या मटकी/मुगाचे सँडविच.प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असून पचनासाठी हलके असते.
रव्यामध्ये किंवा ओट्सच्या पीठामध्ये किसलेले गाजर आणि कोथिंबीर टाकून बनवलेली इन्स्टंट मिनी इडली. दिसायला आकर्षक आणि खाण्यास मऊ असल्यामुळे लहान मुले आवडीने संपवतात.
मटार, गाजर आणि बटाटा टाकून बनवलेले पोहे किंवा शेवयांचा उपमा. झटपट तयार होतो आणि कार्बोहायड्रेट्समुळे मुलांना खेळण्यासाठी ऊर्जा मिळते.
नाचणीच्या पिठाचे धिरडे किंवा डोसे. कॅल्शियम आणि लोहाचा उत्तम साठा, ज्यामुळे मुलांची हाडे मजबूत होतात.