Anuradha Vipat
देवघरात गणपती आणि लक्ष्मीची स्थापना करताना वास्तुशास्त्र आणि धार्मिक नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे. जर तिथे शक्य नसेल तर उत्तर किंवा पूर्व दिशा उत्तम मानली जाते.
गणपतीची मूर्ती नेहमी लक्ष्मीच्या डाव्या बाजूला असावी. शास्त्रानुसार लक्ष्मी ही गणपतीची माता मानली जाते.
लक्ष्मीची मूर्ती नेहमी बसलेल्या अवस्थेत असावी. उभ्या लक्ष्मीची मूर्ती घरात स्थिर पैसा टिकू देत नाही.
गणपतीची मूर्ती बसलेली आणि डाव्या सोंडेची असावी. डाव्या सोंडेचा गणपती गृहस्थाश्रमी लोकांसाठी पूजनीय मानला जातो.
मूर्ती कधीही भिंतीला पूर्णपणे चिकटवून ठेवू नका. भिंत आणि मूर्तीमध्ये किमान १ इंचाचे अंतर ठेवावे.
मूर्ती जमिनीवर न ठेवता लाकडी पाटावर किंवा देव्हाऱ्यात ठेवावी.