Anuradha Vipat
चवळीच्या शेंगा केवळ चविष्ट नसून त्या विविध गंभीर आजारांवर आणि आरोग्य समस्यांवर गुणकारी आहेत.
चवळीच्या शेंगांमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
यातील पोटॅशियम आणि फायबरमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते.
चवळीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक असते, जे हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरते
यात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि अॅनिमियापासून बचाव होतो.
उच्च प्रथिने आणि फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.