Swarali Pawar
पावसाळ्यात हिरवी वैरण भरपूर मिळते, पण जास्त दिल्यास जनावरांना त्रास होऊ शकतो. काही सोप्या गोष्टींची काळजी घेतल्यास जनावरे निरोगी राहतात.
सतत फक्त हिरवी वैरण दिल्यास पोटफुगी आणि अपचनाचा धोका वाढतो. हिरव्या वैरणीसोबत दररोज २ ते ३ किलो सुका चारा द्या.
हिरवी वैरण खाल्ल्याने काही दिवस दूध वाढू शकते. मात्र दुधातील फॅट आणि इतर पोषक घटक कमी होऊ शकतात.
पावसात भिजलेली किंवा पाणी साचलेली वैरण जनावरे कमी खातात. पाणी निथळल्यानंतरच ती जनावरांना खाऊ घाला.
चिखल लागलेल्या वैरणीत जंतू आणि घाण असू शकते. अशी वैरण दिल्यास जनावरांचे आरोग्य बिघडू शकते.
वैरणीत कीड, अळ्या किंवा अंडी नाहीत ना, याची खात्री करा. ताजी आणि स्वच्छ वैरणच जनावरांना खाऊ घाला.
एकाच वेळी खूप कुट्टी करून ठेवल्यास ती कुबट होऊ शकते. गरजेपुरतीच कुट्टी करून ताजी वैरण द्या.
उरलेली वैरण वेळेवर काढून गव्हाणी स्वच्छ करा. बुरशीयुक्त वैरण टाळा आणि चारा कोरड्या, स्वच्छ ठिकाणी साठवा.