Lipoma vs Cyst : हाताला गाठ आली आहे? का वाढलीय चरबी? जाणून घ्या फरक

Anuradha Vipat

गाठ

बऱ्याचदा  गाठ साधी 'चरबीची गाठ' असते, तर कधी ते काही वेगळे असू शकते. 

Lipoma vs Cyst | agrowon

चरबीची गाठ

ही शरीरातील चरबीच्या पेशी एका ठिकाणी जमा झाल्यामुळे तयार होते.

Lipoma vs Cyst | agrowon

वेदना

चरबीची गाठ गाठ हाताने दाबल्यावर मऊ लागते. बोटाने हलवल्यास ती त्वचेखाली इकडे-तिकडे सरकते. यात वेदना होत नाहीत.

Lipoma vs Cyst | agrowon

सिस्ट गाठी

ही गाठ सहसा कडक असते आणि त्यात द्रव किंवा तेलकट पदार्थ असू शकतो. कधीकधी याला संसर्ग झाल्यास वेदना होतात.

Lipoma vs Cyst | agrowon

गँगलियन सिस्ट

ही गाठ सहसा मनगटावर किंवा सांध्यांजवळ येते. यात जेलीसारखा पदार्थ असतो.

Lipoma vs Cyst | agrowon

लिम्फ नोड्स

संसर्गामुळे हाताच्या बगलेत किंवा मानेवर गाठी येऊ शकतात. 

Lipoma vs Cyst | agrowon

लक्षणे

जर गाठीमध्ये खालील लक्षणे दिसली, तर ती साधी चरबीची गाठ नसून डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे.

गाठ खूप कडक असेल आणि हलत नसेल.

गाठीचा आकार खूप वेगाने वाढत असेल.

Lipoma vs Cyst | agrowon

Horoscope 23 March 2026 : आजच्या दिवशी भगवान शंकराची उपासना करणे ठरेल शुभ

Horoscope 23 March 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...