Anuradha Vipat
खोबरेल तेल आणि मध एकत्र करून ओठांवर लावल्यास ओठ मुलायम होतात.
लिंबू आणि मध एकत्र करून ओठांवर लावल्यास ओठांचा काळेपणा कमी होतो.
गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून ओठांवर लावल्याने ओठांना गुलाबी रंग येतो.
बीटरूटचा रस ओठांवर लावल्याने ओठांचा काळेपणा कमी होतो.
नारळ तेलात कोरफड मिसळून ओठांवर लावल्याने ओठांना थंडावा मिळतो.
गुलाब जल आणि ग्लिसरीन सम प्रमाणात मिसळून ओठांवर लावा. हे मिश्रण ओठांना मुलायम आणि गुलाबी ठेवण्यास मदत करते.
एक चमचा मध आणि एक चमचा साखर एकत्र करून ओठांवर हलक्या हाताने मसाज करा.