Anuradha Vipat
रोजच्या वापरासाठी कानातले निवडताना ते वजनाने हलके, दिसायला नाजूक आणि कपड्यांमध्ये न अडकणारे असावेत.
ऑफिस, कॉलेज किंवा घरातील कामांसाठी तुम्ही खालील लहान आणि स्टायलिश कानातल्यांच्या डिझाइन्स निवडू शकता.
यात लहान सोन्याचे किंवा चांदीचे मणी, सिंगल डायमंड , लहान फुलांचे किंवा पानांचे आकार खूप सुंदर दिसतात.
प्लेन गोल्ड, सिल्व्हर किंवा लहान खडे जडवलेले हुप्स सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. हे झोपताना किंवा फोनवर बोलताना टोचत नाहीत.
जर तुम्हाला थोडेसे लटकणारे पण हलके कानातले हवे असतील, तर सुई-दोरा डिझाईन सर्वोत्तम आहे.
आजकालच्या तरुणींमध्ये या डिझाईन्सची मोठी क्रेझ आहे. त्रिकोण , चौकोन, किंवा हेक्सॅगॉन अशा वेगवेगळ्या आकारांचे लहान मेटल स्टड्स.
मोती कधीही फॅशनच्या बाहेर जात नाही आणि तो प्रत्येक रंगाच्या कपड्यावर उठून दिसतो.