Anuradha Vipat
घरगुती आणि केमिकलमुक्त क्लिनर बनवणे अत्यंत सोपे, स्वस्त आणि आरोग्यासाठी सुरक्षित आहे.
घरामध्ये उपलब्ध असणारे व्हिनेगर, बेकिंग सोडा , आणि लिंबू यांच्या मदतीने तुम्ही क्लिनर्स तयार करू शकता.
पांढरे व्हिनेगर , पाणी आणि १०-१२ थेंब लिंबू किंवा लव्हेंडरचे सुगंधी तेल एका स्प्रे बॉटलमध्ये समप्रमाणात मिक्स करा आणि बॉटल चांगली हलवून घ्या.
पाणी, व्हिनेगर, आणिआयसोप्रोपिल अल्कोहोल सर्व साहित्य स्प्रे बॉटलमध्ये एकत्र करा. काचेवर स्प्रे करून वर्तमानपत्राच्या कागदाने किंवा सुती कपड्याने पुसून घ्या.
टॉयलेट पॉटमध्ये किंवा टाईल्सवर आधी बेकिंग सोडा पसरवून टाका. त्यावर व्हिनेगर स्प्रे करा. १५ मिनिटांनी ब्रशने घासून पाणी टाकून द्या.
बेकिंग सोड्यामध्ये लिंबाचा रस मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट डागांवर लावून १० मिनिटे ठेवा आणि नंतर स्क्रबरने घासून धुवून घ्या.
पाण्यात बेकिंग सोडा पूर्ण विरघळवून घ्या. त्यात सुगंधी तेलाचे थेंब टाका आणि घरात स्प्रे करा. बेकिंग सोडा हवेतील दुर्गंधी शोषून घेतो.