Anuradha Vipat
वयाच्या चाळीशीनंतर निरोगी आयुष्यासाठी जीवनशैलीत खालील बदल करणे अत्यंत आवश्यक आहे.
प्रथिनांचे प्रमाण वाढवा आणि साखर, मीठ व मैद्याचा वापर कमी करा.
दररोज किमान ३० मिनिटे वेगाने चालणे, योगासने किंवा हलका व्यायाम सुरू करा.
वर्षातून किमान एकदा फुल बॉडी चेकअप करा. यामध्ये मधुमेह, रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि थायरॉईडची तपासणी करून घेणे गरजेचे आहे
दररोज ७-८ तासांची शांत झोप घ्या. तणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा आवडीचे छंद जोपासा
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी आणि त्वचेचे आरोग्य टिकवण्यासाठी दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या.
स्नायूंच्या मजबुतीसाठी वेट ट्रेनिंग किंवा योगासने सुरू करा.