Anuradha Vipat
जीवनाशी संबंधित काही अशी सत्ये आहेत जी स्वीकारणे सुरुवातीला कठीण वाटते, पण ती स्वीकारल्यास आयुष्य अधिक सोपे आणि अर्थपूर्ण होते.
तुम्ही कितीही चांगले वागलात तरी कोणीतरी तुमच्यावर नाराज असणारच. तुम्ही सर्वांना आनंदी ठेवू शकत नाही.
वेळ कोणासाठीही थांबत नाही. गेलेली वेळ आणि संधी पुन्हा कधीही परत येत नाही.
प्रत्येक व्यक्ती स्वार्थी असते हे ऐकायला वाईट वाटले तरी प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या गरजा आणि सुखाला प्राधान्य देते.
आरोग्याशिवाय सर्व काही शून्य आहे. तुम्ही कितीही पैसे कमावले तरी जर तुमचे शरीर साथ देत नसेल तर त्या संपत्तीचा काहीही उपयोग नाही.
लोक तुमच्या यशाला ओळखतात, कष्टाला नाही: तुम्ही किती संघर्ष केला याच्याशी कोणालाही देणंघेणं नसतं.
दुःख हे जीवनाचा अविभाज्य भाग आहे. केवळ सुख मिळेल ही अपेक्षा करणे चुकीचे आहे.