sandeep Shirguppe
खेडेगावातील प्रत्येकाच्या परस बागेत गवती चहा आपल्या शरिराला अत्यंत उपयुक्त आणि आरोग्यदायी फायदे देणार असतो.
लेमन ग्रास म्हणजेच गवती चहा होय. हा एखाद्या गवताप्रमाणे दिसत असला तरी सामान्य गवतापेक्षा थोडा मोठा असतो.
सर्दी, पडसं किंवा ताप आल्यास गवती चहा प्यावा तसंच या त्याच्या काढ्याने वाफारा घ्यावा.
पोट दुखत असल्याच किंवा पोटाचे विकार असल्यास गवती चहा पाण्यात उकळून प्यावा.
थंडी-ताप किंवा आकडी येत असल्यासही गवती चहा उकळून प्यायल्यास आराम मिळतो.
जर पोट फुगत असेल तर गवती चहाचा काढा घ्यावा.
डोकं दुखत असल्यास साध्या चहाच्या पाण्यात चार पानं गवती चहाची घालावीत.
गवती चहा उष्ण, स्वेदजनन, मूत्रजनन, ज्वरघ्न, वायुनाशी, उत्तेजक, चेतनाकारक, संकोचविकासप्रतिबंधक आहे.
शरीराचा कुठलाही अवयव दुखत असल्यास गवती चहाच्या तेलाने त्या भागावर मालिश करावी.