Leg Pain Causes : पाय का दुखतात? पायदुखीची ५ मुख्य कारणे आणि घरगुती उपाय

Anuradha Vipat

मुख्य कारणे

पोषक तत्वांची कमतरता, स्नायूंचा ताण, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होणे आणि सायटिका किंवा व्हेरिकोज व्हेन्स सारख्या नसांच्या समस्या ही पायदुखीची मुख्य कारणे आहेत.

Leg Pain Causes | agrowon

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी३

कॅल्शियम कमी असल्यामुळे हाडे कमकुवत होतात, ज्यामुळे पायात सतत संथ वेदना जाणवते.

Leg Pain Causes | agrowon

स्नायूंचा ताण

जास्त चालणे, धावणे, व्यायाम किंवा जड काम केल्यामुळे पायाच्या स्नायूंवर ताण येतो.

Leg Pain Causes | Agrowon

पाण्याची कमतरता

शरीरात पाणी आणि पोटॅशियम, मॅग्नेशियम सारख्या खनिजांची कमतरता झाल्यास रात्रीच्या वेळी पायाच्या पोटऱ्यांमध्ये कडक गोळे येतात.

Leg Pain Causes | Agrowon

रक्ताभिसरण

धमन्या आकुंचन पावल्यामुळे पायांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही, ज्यामुळे विशेषतः चालताना पाय भरून येतात.

Leg Pain Causes | Agrowon

संधिवात

वाढत्या वयानुसार गुडघे किंवा घोट्यांच्या सांध्यातील कूर्चा झिजल्यामुळे सांधेदुखी आणि पायदुखी सुरू होते.

Leg Pain Causes | Agrowon

युरिक ॲसिड

शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्यास पायाच्या अंगठ्यामध्ये आणि सांध्यांमध्ये तीव्र वेदना व सूज येते.

Leg Pain Causes | Agrowon

Calcium Deficiency : कॅल्शियम कमी असल्यास काय खावे? जाणून घ्या सर्वोत्तम आहार

Calcium Deficiency | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...