Leek Exotic Vegetable : कांद्यासारखी दिसणारी परदेशी भाजी लीक

Team Agrowon

लीक ही परदेशी भाजी पीक कांदा कुळातील पीक आहे. याचे शास्त्रीय नाव ‘अलियम पोरम’ आहे.

Leek Exotic Vegetable | Agrowon

रोपाचा खाली असलेला पांढरा भाग आणि हिरवी गडद रंगाची पाने खाण्यासाठी वापरतात. पाने बारीक कापून सॅलेडमध्ये वापरतात.

Leek Exotic Vegetable | Agrowon

ज्या लोकांना ओल्या पातीच्या कांद्याचा किंवा साध्या कांद्याचा उग्र वास आवडत नाही, त्यांना लीकमधून अल्हादकारक स्वाद व चव मिळू शकते.

Leek Exotic Vegetable | Agrowon

लीक हे युरोपमधील मुख्य भाजी आहे. भारतात जम्मू-काश्‍मीर, उत्तर प्रदेश, गुजरात, दक्षिणेकडील राज्यात या भाजीची लागवड होते.  

Leek Exotic Vegetable | Agrowon

महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सांगली, सातारा, नगर जिल्ह्यांतील काही शेतकरी थोड्या थोड्या क्षेत्रावर या भाजीची लागवड करतात.  

Leek Exotic Vegetable | Agrowon

या भाजीमध्ये साखर, कार्बोहायड्रेट्‌स, स्निग्ध पदार्थ, तंतूमय पदार्थ, प्रथिने, जीवनसत्त्वे, सूक्ष्म खनिजे पुरेशा प्रमाणात असतात.

Leek Exotic Vegetable | Agrowon

राज्यातील  हवामानात वर्षभर या पिकाची लागवड करता येते.  

Leek Exotic Vegetable | Agrowon
आणखी पाहा...