Sunflower Cultivation : जाणून घ्या सूर्यफूल लागवडीचे तंत्र

Team Agrowon

सुर्यफूल हे पीक प्रकाश असंवेदनशील असल्यामुळे तीनही हंगामात घेतले जाते.

Sunflower Cultivation | Agrowon

पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीत लागवड करावी.

Sunflower Cultivation | Agrowon

पिकाचे मूळ ६० सें.मी.पर्यंत खोलवर जात असल्यामुळे २० ते ३० सें.मी. खोलवर पहिली नांगरट करावी. दुसरी नांगरट उथळ करावी. त्यानंतर २ ते ३ कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.

Sunflower Cultivation | Agrowon

सुधारित जाती - ८ ते १० किलो प्रतिहेक्‍टरी, संकरित जाती - ५ ते ६ किलो प्रतिहेक्‍टरी

Sunflower Cultivation | Agrowon

दोन चाड्याच्या पाभरीने पेरणी करावी. त्यामुळे रासायनिक खते व बी एकाच वेळी पेरता येतात.

Sunflower Cultivation | Agrowon

पेरणीनंतर १० ते १५ दिवसांनी विरळणी करावी.विरळणी केलेल्या क्षेत्रामध्ये बिगर विरळणी क्षेत्रापेक्षा १८ ते २३ टक्के अधिक उत्पादन मिळते. 

Sunflower Cultivation | Agrowon

हे पीक परपरागसिंिचत आहे. परागकण जड असल्यामुळे वाऱ्यापासून परपरागीकरण अतिशय कमी प्रमाणात होते.  नैसर्गिक मधमाश्‍या कमी आढळल्यास कृत्रिमरीत्या परागीकरण घडवून आणल्यास उत्पादनात २० ते ४० टक्के वाढ होते. 

Sunflower Cultivation | Agrowon