Roshan Talape
उन्हाळ्यात उष्णतेमुळे शरीर थकलेले व सुस्त वाटते. पण तुम्हाला माहीत आहे का की थंड पाण्याने अंघोळ केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात?
थंड पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल टिकून राहते, त्यामुळे त्वचा तजेलदार व मऊ राहते.
तसेच थंड पाण्यामुळे शरीराला ताजेतवाने वाटते आणि उष्णतेमुळे आलेली सुस्ती दूर होते.
गरम पाण्याच्या तुलनेत थंड पाणी केसांचे आरोग्य सुधारते, केस गळणे कमी होते आणि ते अधिक चमकदार दिसतात.
रात्री थंड पाण्याने अंघोळ केल्यास शरीर शांत होते आणि गाढ आणि आरामदायी झोप लागते.
थंड पाणी शरीराचे तापमान संतुलित ठेवते, ज्यामुळे उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास कमी होतो आणि शरीराला थंडावा मिळतो.
थंड पाण्याने अंघोळ केल्याने मेंदूत सकारात्मक हार्मोन्स स्रवतात, ज्यामुळे मानसिक तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते.
थंड पाणी शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि आजारांपासून बचाव होतो.