Roshan Talape
चांदीची भांडी किंवा दागिने काळे पडले असतील, तर काळजी करू नका. घरच्या घरी काही सोप्या उपायांनी ती पुन्हा चमकवता येतात.
लिंबाचा रस आणि मीठ मिसळून हे मिश्रण चांदीवर लावा. काही वेळानंतर धुवून टाका. चांदी पुन्हा चमकू लागेल.
बेकिंग सोडा पाण्यात मिसळा आणि त्यात चांदी काही वेळ ठेवावी. नंतर हलक्या पद्धतीने घासून धुवावी यानंतर चांदी पुन्हा चमकेल.
गरम पाण्यात थोडा डिटर्जंट टाका. त्यात चांदीची वस्तू १० मिनिटे ठेवा. नंतर धुवून ती कोरड्या कपड्याने नीट पुसावी यामुळे चांदीला चमक येते.
कोकम किंवा चिंचाच्या पाण्यात चांदी काही वेळ ठेवल्यानंतर ती धुवून कोरड्या कपड्याने पुसा. यामुळे चांदीवरील काळेपणा निघून जाण्यास मदत होते.
सफेद टूथपेस्ट चांदीवर लावून जुना ब्रश वापरून हलकं घासा. मग पाण्याने धुवून कोरड्या कपड्याने पुसल्याने चांदी चमकते.
गरम पाण्यात अॅल्युमिनियम फॉईल पेपर, बेकिंग सोडा घाला आणि चांदीची वस्तू ठेवा. ५ मिनिटांनी ती बाहेर काढून धुवून कोरड्या कपड्याने पुसल्यास चांदीला चमक मिळते.
चांदीची वस्तू नेहमी कोरड्या कपड्याने स्वच्छ करा आणि हवाबंद डब्यात ठेवाव्यात. यामुळे चांदी काळी पडत नाही.