Roshan Talape
वेळेवर जेवन केल्यामुळे पचन सुधारते आणि अनेक आजारांपासून बचाव होण्यास मदत मिळते.
सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान नाश्ता केल्यास दिवसभर शरीराला ऊर्जा मिळते आणि पचनक्रियाही योग्य राहते.
दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत जेवण केल्यास अन्न नीट पचते आणि थकवा जाणवत नाही.
रात्रीचे जेवण संध्याकाळी ७ ते ८ च्या दरम्यान घ्यावे. उशिरा जेवण केल्यास पचन बिघडते तसेच झोपेवरही परिणाम होतो.
त्यामुळे दररोज ठराविक वेळी जेवण करण्याची सवय लावा, तसेच जेवन करताना मोबाइल व टीव्हीपासून दूर राहणे फायदेशीर ठरते.
वेळेवर जेवन केल्यास पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रणात राहते आणि शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.
तसेच उशिरा जेवल्यास शरीरात ऍसिडिटी, अपचन, वजनवाढ, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
वेळेवर आणि योग्यरित्या खाणे हे निरोगी जीवनाचे रहस्य आहे. म्हणून आजपासूनच वेळापत्रक पाळायला सुरुवात करा.