Roshan Talape
जांभळाच्या बियांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स व अॅस्ट्रिजंट घटक असतात, जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात.
जांभळाच्या बियांचा चूर्ण घेतल्यास अपचन, जुलाब व अजीर्ण यावर आराम मिळतो.
या बियांमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे हृदयाची कार्यक्षमता सुधारते आणि कोलेस्टेरॉल कमी होते.
या बियांमध्ये असणारे पोषक घटक शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात, त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.
जांभळाच्या बिया ब्लड शुगर नियंत्रित करण्यात अत्यंत उपयुक्त असून नैसर्गिक इंसुलिनसारखे काम करतात.
जांभळाच्या बिया मेटाबॉलिझम वाढवून वजन कमी करण्यात मदत करतात.
तसेच या बिया लघवीची जळजळ, जास्त लघवी होणे किंवा मूत्राशयाशी संबंधित तक्रारींवर फायदेशीर ठरतात.
जांभळाच्या बियांचा लेप तयार करुन शरीरावरील मुरूम, खरूज आणि त्वचाविकारांवर लावल्यास आराम मिळतो.