Roshan Talape
गॅस सिलेंडर वापरताना त्याची वैधता तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सिलेंडरच्या खालच्या भागावर असलेल्या टेस्ट डेट कोड वरुन सिलेंडरची तपासणी केव्हा झाली आणि पुढील तपासणी कधी होणार हे समजते.
सिलेंडरवर रंगीत कोड आणि त्यासोबत एक अक्षर असते. उदा. “A-24” म्हणजे जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीत सिलेंडरची वैधता संपणार आहे.
A – जानेवारी ते मार्च,
B – एप्रिल ते जून,
C – जुलै ते सप्टेंबर,
D – ऑक्टोबर ते डिसेंबर.
टेस्टिंग यंत्रणेकडून ठरवलेले लाल, निळा आणि पिवळा हे रंग सिलेंडर तपासणीसाठी वापरले जातात.
स्फोट, गळती आणि आग यांसारख्या धोक्यांची शक्यता असते, त्यामुळे ही सिलेंडरवरील माहिती उपयोगी ठरते.
तत्काळ आपल्या वितरक एजन्सीकडे संपर्क साधा आणि सिलेंडर बदला.
सुरक्षित स्वयंपाकासाठी प्रत्येकवेळी सिलेंडरची चाचणी तारीख तपासा. ही सवय तुमच्या घरासाठी सुरक्षित ठरेल.