Swarali Pawar
"कोलेटोट्रिकम कॅपसिकी" या बुरशीमुळे करपा रोग होतो.
सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान रोगाची तीव्रता जास्त असते.
ढगाळ हवामान, जास्त पाऊस, कमी निचरा होणारी जमीन, २१-२३°C तापमान व ८०% आर्द्रता हे वातावरणातले घटक रोग वाढवतात.
पानांवर अंडाकृती, गोलाकार तपकिरी डाग, उन्हात पाहिल्यास त्यामध्ये वर्तुळे दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यावर ठिपके वाढून संपूर्ण पान करपते, पान तांबूस-राखाडी होते, शेवटी पाने गळून पडतात.
करपलेल्या पानांमुळे अन्ननिर्मिती थांबते, पिकाची वाढ थांबते, कंदाचीही वाढ खुंटते, उत्पादन घटते.
रोगग्रस्त पाने-फुले गोळा करून जाळा, रोगाचा प्रसार थांबवा.
२०-२५ ग्रॅम मँकोझेब (७५ WP) किंवा १०-१५ ग्रॅम कार्बेन्डाझिम (५० WP) किंवा २५ ते ३० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड (५० WP) प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा एक टक्का बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी.
प्रोपीकोनॅझोल (२५ ई. सी.) ५ ते १० मि.लि. किंवा क्लोरोथॅलोनील (७५ डब्ल्यू. पी.) २० ते २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.