Anuradha Vipat
दिवाळीच्या दिवशी माता महालक्ष्मी, भगवान गणेश आणि धनराज कुबेर यांची पूजा केल्याने घरात सुख-शांती आणि अखंड ऐश्वर्य नांदते.
भटजींशिवाय घरच्या घरी अगदी सोप्या आणि शास्त्रोक्त पद्धतीने लक्ष्मीपूजन कसे करावे, याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे.
माता लक्ष्मी, गणेश आणि कुबेर देव यांचा फोटो किंवा मूर्ती, पूजेचा चौरंग (पाट) आणि लाल किंवा पिवळे वस्त्र, तांब्याचा कलश, नारळ, आंब्याची पाने किंवा विड्याची पाने, अक्षता (तांदूळ), हळद, कुंकू, चंदन, गुलाल, सुगंधी फुले, दुर्वा, झेंडूचे तोरण, पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर) आणि सोन्या-चांदीची नाणी/दागिने , लाह्या, बत्तासे, धणे आणि गूळ (विशेष नैवेद्य), मातीचे दिवे, कापूर, उदबत्ती आणि शुद्ध तूप.
घराचा ईशान्य किंवा पूर्व कोपरा स्वच्छ करून रांगोळी काढा. तेथे चौरंग ठेवून त्यावर लाल कापड अंथरा.
पाटाच्या मध्यभागी तांदळाची छोटी रास ठेवा . त्यावर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. लक्ष्मीच्या डाव्या बाजूला तांदळाच्या राशीवर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवा.
पाटावर उजव्या बाजूला तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा कलश ठेवा. कलशात पाणी, नाणे, सुपारी टाकून त्यावर आंब्याची पाने ठेवा आणि त्यावर नारळ स्थापित करा.
लक्ष्मी देवीच्या समोर चांदीची नाणी, नोटा किंवा घरातील दागिने आणि कुबेराचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवा.