Anuradha Vipat
नियमित दुधी भोपळ्याचा रस पिण्याने शरीराला भरपूर फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक जीवनसत्त्वे मिळतात.
हा रस शरीराला आतून थंड ठेवण्यासोबतच वजन वेगाने कमी करण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.
दुधी भोपळ्याच्या रसात कॅलरीजचे प्रमाण अत्यंत कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. भूक नियंत्रित राहते.
यामुळे रक्तदाब नियंत्रित राहून हृदयविकाराचा धोका कमी होतो.
यात पाण्याचे आणि फायबरचे प्रमाण मुबलक असल्याने पचनसंस्था स्वच्छ होते. गॅस, अॅसिडिटी आणि जुनाट बद्धकोष्ठतेचा त्रास याने दूर होतो.
सकाळी रिकाम्या पोटी हा रस प्यायल्याने शरीरातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर पडतात.
शरीरातील अंतर्गत शुद्धीकरणामुळे रक्ताभिसरण सुधारते. यामुळे चेहऱ्यावरील मुरुम कमी होतात आणि त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो.