Anuradha Vipat
"हसणे हे जगातील सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम औषध आहे" असे म्हटले जाते.
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात तणाव हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे.
मनापासून हसणे हा तणाव कमी करण्याचा सर्वात सोपा, नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे.
हसण्यामुळे मेंदूत 'एंडोर्फिन' आणि 'डोपामाइन हे आनंदी संप्रेरके वेगाने तयार होतात. हे हार्मोन्स मूड त्वरित सुधारतात.
हसण्यामुळे शरीरातील 'कॉर्टिसॉल' आणि 'अॅड्रिनालाईन' या तणाव वाढवणाऱ्या हार्मोन्सची पातळी झपाट्याने खाली येते.
मनापासून हसल्याने मानसिक थकवा दूर होतो. दिवसातून १५-२० मिनिटे आनंदी राहिल्याने नैराश्य आणि अस्वस्थता कमी होते.
हसताना आपल्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.