Anuradha Vipat
कमकुवत रोगप्रतिकारशक्ती यामुळे सर्दी-खोकला होणे ही एक सामान्य समस्या आहे.
अँटीबायोटिक्स किंवा कफ सिरप या औषधांमुळे सुस्ती येणे किंवा पोटाचे विकार होऊ शकतात.
आल्याचा ताजा रस त्यात शुद्ध मध आणि चिमूटभर काळी मिरी पूड हे मिश्रण दिवसातून ३ वेळा थोडे-थोडे चाटा.
तुळशीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे संसर्गाशी लढण्यास मदत करतात.
रात्री खोकल्याची उबळ येऊन झोप मोड होत असेल, तर हळदीचे दूध सर्वोत्तम उपाय आहे.
ज्येष्ठमधाचा छोटा तुकडा तोंडात ठेवून त्याचा रस चोखत राहा. यामुळे घसा ओला राहतो.
गरम पाण्यात ओवा किंवा निलगिरी तेलाचे २ थेंब टाकून दिवसातून दोनदा वाफ घ्या.