Anuradha Vipat
लक्ष्मी-नारायणाची कृपा प्राप्त करणे हे सुख, समृद्धी आणि मोक्ष मिळवण्याचे प्रतीक मानले जाते.
मार्गशीर्ष महिना हा विष्णूला अत्यंत प्रिय असल्याने या काळात केलेले उपाय अधिक फलदायी ठरतात.
दर गुरुवारी सकाळी लक्ष्मी आणि नारायणांच्या मूर्तीची एकत्रित पूजा करा. त्यांना पिवळी फुले, तुळशीपत्र अर्पण करा.
"ओम नमो भगवते वासुदेवाय" किंवा "श्री महालक्ष्म्यै नमः" या मंत्रांचा एकत्रित जप करा.
दररोजच्या पूजेमध्ये विष्णूंना तुळशीपत्र अर्पण केल्याने आणि तुळशीच्या झाडाजवळ संध्याकाळी दिवा लावल्याने कृपा प्राप्त होते.
मार्गशीर्ष महिन्यात घरी सत्यनारायणाची पूजा घालावी. ही पूजा लक्ष्मी-नारायणाला समर्पित आहे.
मार्गशीर्ष महिन्यात किंवा वर्षभर दर गुरुवारी लक्ष्मीचे व्रत केल्याने आर्थिक समस्या दूर होतात.