Anuradha Vipat
नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासात कुट्टूचे पीठ खाण्याला आरोग्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे.
हे केवळ एक पारंपारिक अन्न नसून पोषक तत्वांचा खजिना असलेले सुपरफूड आहे.
ऋतुबदलाच्या काळात शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा आणि पोषण देण्यासाठी हे पीठ अत्यंत फायदेशीर ठरते.
कुट्टू हे खरं तर धान्य नसून एका वनस्पतीच्या फुलांचे बी आहे. त्यामुळे ते पूर्णपणे ग्लुटेन-फ्री असते.
कुट्टूच्या पिठामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. हे पीठ खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे उपवासाच्या काळात वारंवार भूक लागत नाही.
उपवासामुळे अनेकदा शरीरात थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो. कुट्टूमध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स असतात. यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते,
कुट्टूचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे हे पीठ खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढत नाही.