Elephant Village : काय सांगता...! भारतात आहे हत्तींच गाव

Mahesh Gaikwad

हत्तींसाठी गाव वसवले

तुम्ही अशा गावाबद्दल कधी ऐकलंय का, की ते फक्त हत्तींसाठी वसविण्यात आले आहे. पण भारतात असे एक गाव आहे. जे हत्तींसाठी वसलेले आहे.

Elephant Village | Agrowon

हत्तींना राहण्यासाठी गाव

या गावात हत्तींना राहण्यासाठी सर्व सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. हे गाव पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यटक येथे येत असतात.

Elephant Village | Agrowon

जयपूर आमेर किल्ला

राजस्थानातील जयपूर येधील आमेर किल्ल्याजवळ कुंडा हे गाव आहे. या गावाला एलिफंट व्हिलेज अर्थात हत्तींचे गाव म्हणून ओळखतात.

Elephant Village | Agrowon

राजस्थान पर्यटन

राजस्थान पर्यटनासाठी जगप्रसिध्द आहे. राजस्थानमध्ये पर्यटनासाठी आलेले देशविदेशातील पर्यटक या गावाला आवर्जून भेट देतात.

Elephant Village | Agrowon

हत्ती सफारी

या गावात पर्यटक केवळ हत्ती सफारीचाच आनंद घेत नाहीत, तर त्यांना हत्तींची जीवनशैली जवळून अनुभवता येते.

Elephant Village | Agrowon

पहिले हत्तींचे गाव

जयपूरमध्ये वसलेले हत्ती गाव हे जगातील तिसरे आणि भारतातली पहिले हत्तींसाठीचे गाव आहे. हे गाव केवश हत्तींसाठी वसविण्यात आले आहे.

Elephant Village | Agrowon

एलिफटं राईड

हे गाव जवळजवळ १०० एकर परिसरामध्ये पसरले आहे. आमेर किल्ल्यावरील एलिफंट राईड प्रसिध्द आहे. त्यामुळे किल्ल्याच्या परिसरातच हत्तींना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Elephant Village | Agrowon

हत्तींची संख्या

येथील हत्तींची वाढती संख्या पाहता राजस्थान सरकारने २००८ साली या गावाला हत्तींचे गाव म्हणून घोषित केले. सध्या या गावात जवळपास १९० हत्ती आहेत.

Elephant Village | Agrowon
Elephant Camp | Agrowon