Anuradha Vipat
कृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि पवित्र सणांपैकी एक आहे.
हा सण भगवान विष्णूंचे आठवे अवतार भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्मोत्सवाच्या प्रीत्यर्थ दरवर्षी श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला अतिशय उत्साहाने साजरा केला जातो.
संपूर्ण भारतात, विशेषतः मथुरा, वृंदावन आणि महाराष्ट्रात या सणाचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळतो.
मथुरेचा राजा 'कंस' हा अत्यंत क्रूर आणि अन्यायी होता. कंसाने आपले वडील उग्रसेन यांना गादीवरून हटवून स्वतः कारागृहात टाकले आणि राजेपद बळकावले.
जेव्हा कंसाची बहीण 'देवकी' हिचा विवाह 'वसुदेव' यांच्याशी झाला, तेव्हा एक आकाशवाणी झाली. "देवकीचा आठवा मुलगा कंसाचा वध करेल.
मृत्यूच्या भीतीने कंसाने देवकी आणि वसुदेव यांच्या पहिल्या ६ अपत्यांना जन्माला येताच मारून टाकले. सातवे अपत्य योगमायेने रोहिणीच्या गर्भात स्थलांतरित केले गेले. अखेर, श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रावर भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला.
जन्मानंतर वसुदेवांनी कंसाच्या नकळत बाळकृष्णाला यमुना नदी पार करून गोकुळात त्यांचे मित्र नंदराज आणि यशोदा यांच्या घरी सुरक्षितपणे पोहोचवले. तेथेच कृष्णाचे बालपण गेले आणि पुढे जाऊन त्यांनी कंसाचा वध करून जनतेला जुलमी राजवटीतून मुक्त केले.