Anuradha Vipat
कृष्ण जन्माष्टमी किंवा फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी लहान मुलाला 'बाळकृष्ण' बनवणे हा एक अतिशय आनंददायी अनुभव असतो.
मुलाला सुंदर बाळकृष्णाचे रूप देताना तो दिसायला जितका गोड वाटेल, तितकाच त्याला तो पेहराव कम्फर्टेबल असणे गरजेचे आहे.
बाळकृष्णासाठी पिवळ्या किंवा केशरी रंगाची सुती किंवा मऊ सिल्कची धोती उत्तम मानली जाते.
धोतीवर कंबरेला बांधण्यासाठी किंवा खांद्यावरून टाकण्यासाठी एक शेला किंवा पटका वापरा.
बाळकृष्णाच्या गेटअपचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मुकुट. कागदी, मखमली किंवा मऊ प्लास्टीकचा हलका मुकुट निवडा.
मुकुटाच्या अगदी मध्यभागी मोरपीस लावणे अजिबात विसरू नका. मोरपिसाशिवाय कृष्णाचे रूप पूर्ण होऊ शकत नाही.
कान्हाला हातात धरण्यासाठी एक छोटी लाकडी किंवा प्लास्टिकची सजवलेली बासरी द्या.