sandeep Shirguppe
ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी झाला असून, कोल्हापुरी चपलेस 'क्यूआर कोड' मिळाला आहे.
चपलेच्या आत ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित एक छोटी चीप बसविण्यात आली आली आहे.
ही चप्पल मोबाईलने स्कॅन करताच ही कुठे बनवली, कोणत्या कारागिराने बनवली, याची माहिती उपलब्ध होणार आहे.
हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आता बनावट कोल्हापुरी चप्पल बनविणाऱ्यांवर आणि या बनावट चपलांच्या विक्रीवरही चाप बसणार आहे.
बाजारात बनावट कोल्हापुरी चपलांचा सुळसुळाट वाढल्याने त्याला आळा घालण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने नवा प्रयोग राबवत कोल्हापुरी चपलांना 'क्यू आर कोड दिला.
ग्राहकांना अस्सल आणि चांगली कोल्हापुरी चप्पल मिळावी यासाठी 'लिडकॉम'ने ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित नवीन चपला विक्रीसाठी बाजारात आणल्या आहेत.
तंत्रज्ञान इमरटेक इनोव्हेशन प्रा. लि. या कंपनीने बनविले आहे. ग्राहकांना मोबाईलच्या एका क्लिकवर कोल्हापुरी चप्पल अस्सल आहे की बनावट आहे सहज समजेल.
या नवतंत्रज्ञानामुळे उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत प्रत्येक गोष्टीची माहिती यात ठेवली जाणार आहे.
हा प्रयोग महाराष्ट्रात नाशिक येथील सह्याद्री फार्म येथील विविध प्रकारच्या फळभाज्यांबरोबरच कापूस, रबरच्या विक्रीमध्ये केला गेला आहे.
'लिडकॉम'च्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात चामड्याच्या वस्तूंचे एक मार्च २०२४ पर्यंत प्रदर्शन व विक्री सुरू राहणार आहे.