Anuradha Vipat
आम्ही दिलेल्या काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या कोल्हापुरी चपलांची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकता.
कोल्हापुरी चप्पल पूर्णपणे चामड्याची बनलेली असते. चामड्याचा ओलावा आणि लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी खोबरेल तेल लावा
पावसात किंवा ओल्या जागी कोल्हापुरी चप्पल घालणे टाळा.
चप्पलवर धूळ किंवा माती जमा झाल्यास, मऊ आणि सुक्या कपड्याने किंवा ब्रशने ती स्वच्छ करा.
शक्य असल्यास चप्पल ठेवताना त्यावर एखादा कागद किंवा मऊ कापड झाकून ठेवा.
चप्पलीसाठी चामड्यासाठी वापरले जाणारे विशिष्ट लेदर पॉलिश किंवा शू क्रीम वापरा.
काहीवेळा चप्पल कडक किंवा घट्ट होते. अशावेळी थोडे तेल लावून, चप्पल हाताने थोडी वाकवून मऊ करा